भोपाळ | भारतात बेरोजगारी ही खूप मोठी समस्या झाली आहे. बरोजगारीमुळे तरुण नैराश्यात गेले आहे. कुपोषण आणि बेरोजगारी भाजपाला नियत्रित करता आली नाही. किंबहुना यावर सरकारने उपायात्मक तोडगा देखील काढता आले नाही. त्यामुळे ही सरकार बेरोजगारी मिटविण्यासाठी सपसेल अपयशी ठरली आहे अशी टीका योगगुरु रामदेव बाबा यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली आहे.
दरम्यान, भोपाळ येथील एका कार्यक्रमात रामदेव बाबा यासंदर्भात बोलत होते. भाजपा सरकार बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली नाही. याउलट पतंजलिच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत ११ हजार लोकांना रोजगार दिले आहे. पुढच्या टप्प्यात अजून ११ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमुद केले.