मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आले होते. या बंदला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. शिवसेनेने या बंदला पाठिंबा दिला होता. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधलाय. राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यातील परिस्थिती पाहता या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा भाजपाच्या गोटात चालू आहे असे गौप्यस्फोट त्यांनी केला.
दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती. मुंबईत आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनेक ठिकाणी रेल्वे अडविण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आले.