सोडून द्या त्या तुम्हच्या
मार्क्स आणि लेनिनला
कुठे तरी धूळ खात घराच्या
गळत्या छपरा खाली
नाही जमणार तुम्हाला तो
ति ला सामावून घेण्यास
समाजात आणि माणुसकी
जपण्यास स्वताहून
माहित आहे मला आड येतो
तुम्हचा तो माणूसपण
तुम्ही फक्त टाळी द्या आनंदाने
उडवत थट्टा तिची
आणि बोंबला तो ती
वाजवते म्हणून सगळीकडे
भोगायला जमत सुद्धा
एकाद्या वेळेस गरजेनुसार
पण रस्त्यावरून जातांना
खोट्याच मान अपमानाच्या
वेशीवर टांगला जातो बिचारा
बघतो नेहमीच होणारी मानहानी
आणि मोडला जाणारा वैश्विक
कायदा मानवाधिकाराचा नुसता डोळ्यांनी
नाही उठविता येत ना त्याला
३७७ नुसार आवाज स्वताचा
आम्हीच केलेली असते ना !
मला तुझ्या सोबत पाहून
किती बदनामी होईल माझी
आणि मला सुद्धा लोक
स्वताला सभ्य म्हणवून घेणारे
आणि सभ्यतेला फक्त
घराच्या आत कोंडून
कुलूप बंद करणारे आम्ही
सगळच जमत आम्हाला,
घराची ती चौकट एकदा
ओलांडल्यावर. पण नाही
जमत कधी भावनेशीर वागायला
त्याच्याशी तिच्याशी एकदाही
शी … वाटते कधी चार चौघात
तो ती भेटल्यावर कुठेतरी
आणि साऱ्यात तुलाच काय
तो ती बोलल्यावर काहीतरी.
तुही संकोचित होऊन पाहतोच
सगळीकडे कि,कोण तुला
निरखत असावा समाजाच्या
उंबरठ्यावर आणि कधी
एकदा जीव सुटणार तो ती पासून
कधी तो ती हि सुटत नाही
तुझ्या कामुक नजरेतून
काय ती कंबर आणि काय ते
कहीतरी तुला वाटतेच
पण नाही चालणार कधी
सार्वजनिक रित्या बोलायला
तो ती शी क्षणासाठी सुद्धा
मग कोणती ती माणुसकी
आणि कोणते ते काय? सोडाच सर्व !
– सचिन जाधव
(कवी द व्हाईस ऑफ मुंबईचे साहित्य विभागाचे प्रतिनिधी आहेत)