मी पाहिले डोळ्यांनी घर माझे निलाम होता
छपरे हि पडून खाली तुटून गेली होती
सोडले होते अंगण वास्यानि मिळून साऱ्या
मला हि वाटले तेव्हा हे घर माझेच होते?
फिरल्या होत्या भिंती जाळ्यांच्या विद्रोह होता
खिडकी मात्र आत डोकावून पाहत होती
सारेच दरवाजे मिळूनी घर सोडून गेले होते
विटा विटात कसला आता विद्रोह पेटला होता
होती दिसली फक्त एक चूल शांत तेवढी
ती पेटली होती कधी मलाही भासले नाही
भांड्यांना आता केवढा माज आला होता
करण्या आत्महत्येपासून कोणीच उरले नाही
होती फक्त जमीन तिच्याच जागेवरती
सारेच करुनी खाली घर निघून गेले होते
मी पहिला तमाशा माझा माझ्याच उरावरी
मी पेटलो मशानात अन मशान जळाले होते
– सचिन जाधव
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे साहित्य विभागाचे प्रतिनिधी आहेत)