मुंबई | राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणावरुन आंदोलन सरु असतात आता बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानावर उतरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाज आरक्षणाची मागणी करत असून शासनाने या समाजाकडे दुर्लक्ष केला आहे असा आरोप आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.
यासाठी आज ८ ऑगस्ट २०१८ रोजी हरिभाऊ राठोड याच्या प्रमुख नेतृत्वात आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात लक्षवेधीमध्ये अनेकदा बंजारा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याची शासनस्तरावर कुठलेही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आता बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरत असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले