मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काॅग्रेस कमिमीटीच्या वतीने आमदार हरिभाऊ राठोड यांना मध्यप्रदेश , राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्याचे समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न काॅग्रेस पक्षातून होताना दिसत आहे. हरिभाऊ राठोड यांची भटके विमुक्त, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजावरील संघटनात्मक पकड पाहता राहुल गांधींनी त्यांच्यावर समन्वयकपदाची जबाबदारी दिली आहे. तळागाळातील लोकांपर्यंत काॅग्रेस पक्षाची भूमिका आणि धोरण पोहचविण्याची मोठी जबाबदारी राठोड यांच्यावर असणार आहे.