कोलकाता | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज सकाळी ८ च्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून सोमनाथ चॅटर्जी मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास सोडला.
सोमनाथ चॅटर्जी हे बंगालमधील प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पूत्र होते. १४ व्या लोकसभेतचे सभापती असलेले चॅटर्जी बंगाल प्रांताच्या बोलपूर मतदार संघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी यांची राजकीय सुरुवात सीपीएम पक्षातून झाली ते सलग १० वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा त्यांचा रेकाॅर्ड आहे.