मुंबई | भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत म्हटल्याप्रमाणे सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळायला पाहिजे तसेच समान दर्जाची संधी मिळायला पाहिजे. त्या तरतुदीचं आपण अजूनही अंमलबजावणी केली नाही. असे ओबीसी नेते आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले. राज्यात मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहे. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, ओबीसी त्याचबरोबर मराठा मुस्लीम समाजाला जर खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळाले तर रोजगार उपलब्ध होवून अनेक प्रश्न निकाली लागतील.
नुकतेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाच्या संदर्भात बोलतांना आता सरकारी नोकर्या कुठे उपलब्ध आहेत? असा व्यक्तव्य केला होता. याचाच अर्थ असा की खाजगी क्षेत्रात जास्तीत जास्त नोकर्या आहेत. त्यामुळे खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे ही काळाची गरज आहे. जेणेकरून समजात सामाजिक समरसता वाढेल आणि देश सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल असे राठोड यावेळी म्हणाले.