नवी दिल्ली | संपूर्ण देश आज 72 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविल्यानंतर देशाला संबोधित करताना देशाच्या प्रगती आणि भविष्यातील उद्दिष्टे या विषयावर हात घातला.त्यांच्या ८२ मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी युपीए सरकार च्या तुलनेत एनडीए सरकारची कामाची गती अधिक आहे असे नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भारतातील माणसांना 2022 पर्यंत अंतराळात पाठविणार. तसेच त्यांनी 10 करोड परिवारांना ५ लाख रुपये वार्षिक विमा देण्यासाठी २५ सप्टेंबर पासून ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची घोषणा केली