पक्ष्यांची चिवचिवाट प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. किंबहुना त्यांचा मधूर आवाज ऐकल्यावर मनाला शांती मिळते. पक्ष्याचा सुमधूर आवाज तर आपण ऐकू शकतो मात्र पक्ष्यांना कान नसतांनाही ते कसे ऐकतात याचा विचार आपण कधी केला का? काहीही घडल तर ते लगेच उडून जातात. त्यांना आवाज कसा ऐकू येत असेल. तर चला जाणून घेऊयात.
पक्ष्याचे कान वरुन दिसत नसले म्हणून काय झालं. त्यांना मनुष्यासारखेच आवाज ऐकू येतो. त्यांना बाह्य कान नसते मात्र त्यांच्या कानाची संरचना आतून केलेली आहे. जे आपल्याला वरुन दिसत नाही. काही दिवसांपूर्वी केलेल्या संशोधनानुसार पक्ष्यांना त्यांच्या आतील संरचनेतून आवाज ऐकू यतो.