वाशिम | मंगरुळपिर तालुक्यातील जोगलदरी-सावरगाव या दोन गावांना जोडणारा हा छोटासा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक अश्या परिस्थतीत सध्या आहे. याच रस्त्यावरून रोज अनेक मोठी वाहने तसेच महामंडळाच्या एस टी बसेस ये जा करतात.परंतु या छोट्याश्या पुलावर सतत च्या पावसाने अनेक धोकादायक खड्डे पडले आहेत.याठिकाणी अनेक शाळकरीं मुले सुद्धा ये जा करतात.आजपर्यंत या पुलावरून जाणाऱ्या मोटारसायकल , जनावरे त्याचप्रमाणे माणसे सुद्धा नदी मध्ये पडली आहेत.
नदीला पूर असताना माणसे वाहून गेल्याच्या घटना सुद्धा अनेकदा घडल्या आहेत तरी पण प्रशासन या ठिकाणी मोठा पूल बांधण्यास असमर्थता दाखवत आहे. तरी या ठिकाणी लवकरात लवकर एक मोठा पूल बांधण्यात यावा नाहीतर भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती गावातील पत्रकार आदेश राठोड यांनी दर्शवली आहे.