मुंबई | व्हाट्स अॅपला जगभरात दर महिन्याला तब्बल १.५ बिलियन लोक वापरतात. यामुळे वापरकर्त्याकडे चॅट, विडिओ आणि फोटोस खूप प्रमाणावर जमा राहतात. याकारणामुळे हे अॅप गूगल सोबत बॅकअपसाठी काम करते. ही युजर्ससाठी चांगली त्याचबरोबर वाईट बातमी सुद्धा आहे. चांगली यासाठी की गुगल ने डेटा बॅकअप साठी परवानगी दिली आहे पण याची सीमा १५ जीबी पेक्षा अधिक नाही आणि वाईट बातमी ही की बॅकअपमुळे जुना डेटा जाऊ शकतो.जर तुम्ही जुना अकाउंट डेटाचा बॅकअप घेतला नसेल तर तो सगळा डिलीट होऊ शकतो.
व्हाट्स अॅप आणि गुगल यांच्यात नवीन करारानुसार तुमचे सगळे चॅटस,फोटोस,विडिओ आणि संवाद गूगल ड्राइव्ह मध्ये विनाशुल्क बॅकअप होईल.जर तुमि एक वर्षापेक्षा कमी वेळात तुमचा अकाउंट चा बॅकअप नाही घेतला तर तो १२ नोव्हेंबर पासून सगळा जुना डेटा डिलीट होऊन जाईल.गुगल ने युजर्स ला बॅकअप घेण्यास सांगितले आहे.
आदेश राठोड, प्रतिनिधी