मुंबई | वाढत्या महागाईमुळे मुंबई सारख्या महानगरात सर्वसामान्य लोकांना घर घेणं परवडत नाही. मात्र, आता मुंबईकरांना म्हाडाच्या माध्यमातून अतिशय अल्पदरात घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. येत्या आॅक्टोंबर महिन्यात म्हाडा १००० घरांची लाॅटरी काढणार आहे.
कोकण विभागात जवळपास ९०१८ घराची लाटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशा अल्पदरात म्हाडा रक्कम घेणार आहे. अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे.