तुझं माझं करता करता
एकेदिवशी जाणे आहे
जे काही कमावलेस तू
इथेच ठेऊन देणे आहे
कर काही तू कर्म चांगले
तेच तुझ्या सोबत येतील
तुझ्या चांगल्या कर्मामुळे
लोकं तुझचं नाव घेतील
अश्रू सुद्धा परके होतील
सदा रडत बसल्याने
लोकं तुझ्या जवळ येतील रे
तुझ्या सदा हसल्याने
मला तर ते लोकं आवडतात
जे सर्वांना आपलं मानतात
स्वतःचे जे दुःख विसरुनी
दुसऱ्यांना जे दुःख जाणतात
माणुसकी हि मनात असावी
स्वतःच्या हैसीयत मध्ये नसावी
ईश्वर तुझे कर्म पाहतो
तू केलेली पूजा नाही.
हि गोष्ट सदा लक्षात ठेवावी
प्रा. दिनेश राठोड
(कवी द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)