बदलापूर | गोर बंजारा प्रतिष्ठान बदलापूर आयोजित बंजारा पारंपारिक तिज उत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला या सोहळ्यात पुण्याचे अॅड रमेश राठोड यांना बंजारा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील संपन्न झाला.
याप्रसंगी बंजारा समाजाचे कर्ण, सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध उद्योगपती शंकर पवार, बदलापुरचे नगरसेवक आशिष दामले साहेब, नगरसेवक संभाजी शिंदे साहेब,नगरसेविका प्रमिला पाटील, नगरसेविका शितल राऊत, कामगार आयुक्त डी.सी.राठोड साहेब, डॉ कैलास पवार साहेब आश्विनी राठोड ओंकार आबा जाधव साहेब लक्ष्मण राठोड व बहुसंख्य बंजारा बांधव उपस्थित होते.