डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आपण हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करतो, शिक्षक म्हणजे शि म्हणचे शिल, क्ष- म्हणजे क्षमा, आणि क- करुणा म्हणजेच शिक्षकांचे आचरण योग्य असले पाहिजे,तो संयमी व विद्यार्थ्यांना क्षमा करणारा असावा,आणि त्याच्या हृदयात दया, आपुलकी व प्रेमाची भावना असावी, म्हणतात ना,’गुरुंनी द्यावे ऐसें धडे,आपुला आदर्श ठेवुनी पुढे’ गुरु हा निर्व्यसनी असावा कारण गुरुच जर व्यसन करीत असेल तर त्याला विद्यार्थ्यांना तुम्ही व्यसन करू नका असे म्हणण्याचा अधिकार नाही, आणि गुरूंचे अध्यापन परिणामकारक असले पाहिजे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाला पाहिजे अध्यापन व अध्ययनाशी एकरूप झाला पाहिजे,गुरूंची महती संत कबीरने आपल्या दोह्यांमधून सांगितली आहे,
“गुरु गोबिंद दोहू खडे,
काके लागू पाय,
बलिहारी गुरु आपणो,
गोबिंद दियो बताय।
संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगातून गुरुंची महती सांगितली आहे,
“गुरु कृपेचा आगारु,
गुरु प्रेमाचा सागरु,
तुका म्हणे देव माझा
गुरुविण नाही दुजा”
अशाप्रकारे अनेक संत महात्म्यांनी गुरूंची महती सांगितली आहे.”
ज्याप्रमाणे बंदुकीतून निघालेली एक गोळी एकाच व्यक्तीला ठार करू शकते,पण गुरुंच्या तोंडून निघालेला एक चुकीचा शब्द संपूर्ण पिढीला बरबाद करू शकते,म्हणून गुरूंनी सुद्धा बोलून विचार केल्या पेक्षा विचार करून बोलावे,अध्ययन व अध्यापन हि द्विमार्गी प्रक्रिया आहे,अनेक शाळा व महाविद्यालयात या प्रक्रियेला एकमार्गी बनविल्या जाते नुसते गुरुच अध्यापन करतात विद्यार्थ्यांना नुसते नोट्स लिहून देतात,विद्यार्थ्यांना बोलण्याची संधीही देत नाही त्यांना कितपत समजले हे तापासूनही पाहत नाही ,त्यांना प्रश्नही विचारत नाही,मला सांगा आजपर्यंत अशी एखादी मशिन निघाली का,की जी विद्यार्थ्यांच्या डोक्याला लावल्यानंतर आपल्याला समजेल की,विद्यार्थ्यांना किती समजलं व किती नाही, आपल्याला हे तेंव्हाच कळेल जेंव्हा आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन व अध्यपणात सहभागी करून घेऊ,
शिक्षक हा राष्ट्रनिर्माता आहे,भावी पिढीचा मार्गदर्शक आहे,जेवढे साधू,संत,थोर महात्मे,राजेमहाराजे होऊन गेले त्यांचे मार्गदर्शक त्यांचे गुरुच आहेत,अर्जुन -द्रोणाचार्य, चंद्रगुप्त मौर्य-आर्य चाणक्य,छत्रपती शिवाजी महाराज-दादोजी कोंडदेव,अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येईल,मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मी एक प्राध्यापक आहे,व ईश्वराने मला गोरगरिबांच्या,दिंदुबळ्यांच्या मुलांना अध्यापन करण्याची,मार्गदर्शन करण्याची,त्यांच्यावर सुसंस्कार करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली.
प्रा.दिनेश राठोड
(लेखक इंदिरा गांधी महाविद्यालय हिंगणगाट येथे अर्थशास्त्रचे प्राध्यापक आहेत)