निसर्गतःच जीवनात प्रत्येकालाच कुठे ना कुठे सफलता मिळाली आहे,तसेच वैफल्यही मिळाले आहे.एकच गोष्ट एखाद्याला सुखदायक असू शकते तशी ती दुसर्याला दुख:ही देऊ शकते.एखादा मला मुलगा झाला म्हणुन आनंदाने बागडतो,तर दुसरा मला पाचवा मुलगा झाला म्हणुन रडत बसतो.
साफल्य,वैफल्याची स्वरुपे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या स्वरुपात असू शकतात,किंबहुना व्यक्तिसापेक्षनुसार ती वेगवेगळी असतात,असेच म्हणावे लागेल.कुणासाठी तरी जीव तोडून कष्ट करावेसे वाटणे,सत्कृत्याप्रती जीवनात गती ठेवणे,आवेश ठेवणे,अस्मिता राखणे,हे जीवनाचे विविधांगी भाग आहेत.
तसेच कुणाचे तरी प्रेमाचे,उपदेशाचे,जाणीवसंपन्नते, रागाचे वा बोबडे बोल ऐकायचेत,अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्याच जीवनात वसत असते,काहीतरी वा विशिष्ठ जाणून घ्यायचेय,काहीतरी सांगायचे आहे,कुठेतरी समर्पित होवुन आयुष्याची वाटचाल करायचीये,दृष्टांविषयी संस्कृतीरक्षणार्थ जीवनात त्वेष निर्माण करायचाय,कुठेतरी शहाणे असुनही सर्व सोडून देऊन बालभाव ठेवायचाय,सौंदर्याचा उपासक होण्याची इच्छा नुसती ठेवायची नाही तर जीवनात ते तत्वज्ञान अमलात आणायचंय.
यांसारखे आणि याहुनही अधिक आयुष्याचे विविधांगी भाग आहेत.हे प्रत्येकाला माहीती तर पहिजेतच पण त्यासोबत योग्य वेळेस,योग्य समयी जीवनात तसे ठेवताही आणि आणताही यायला हवेत.यासाठी मुळात मन-बुद्धी व कृती याचा अभ्यास करणे गरजेचे आहे,त्या अभ्यासाचा जीवनाशी संबध येणं हे इथं क्रमप्राप्त आहे हा अभ्यास जो करतो वा करवून घेतो, करण्याची इच्छा प्रबळ करतो वा निर्माण करतो वा ती सांभाळतो तो खरा शिक्षक. अश्या गुरूवर्य शिक्षकांना प्रणाम.
– संतोष राजदेव