मुंबई | बॉलीवूड सुपरस्टार अर्थातच सलमान खान कोट्यवधी मुलींच्या ह्रदयाची धडकन आहे. आपला नवरा सलमान खानसारखा असावा असे अनेक मुलींना वाटत असतं. सलमान खानवर प्रेम करणारी एका मुलीने त्याच्या घरी जाऊन त्याला लग्नाची मागणी घातली. २४ वर्षांची ही तरुणी उत्तराखंडमधून मुंबईत खास सलमानशी लग्न करायला आली आणि सलमानच्या घरी थेट गॅलेक्सी अपार्टमेंटवर पोहोचली.
त्याच्या सुरक्षारक्षकांनी तिला घरात येऊ दिले नाही. त्यानंतर इस्टर्न फ्रीव्हेवर ती विनाकारण भटकत राहिली. लोकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचवलं. ११ ऑगस्ट रोजी ती उत्तराखंडमधून मुंबईकडे रवाना झाली होती.