अरे व-हाडी माणूस
जसं ज्वारीचं कणस
ऊन पाऊस खावून
घास भरवे लोकांस
खरा शंकर तू भोया
माती भिजवे घामानं
बेईमान दुनियेनं
तुया पायला इमान
असमानी सुलतानी
त्वा काय नई साेसली
ऐतखावू दुनियेची
सर्वी गोचडी पोसली
तूनं पिकवल जरी
गैरे खातील रोकडा
तुया नशीबी थिगय
झाला सपन कपडा
तुया पिकल्या तुरीनं
खादाड खातेत पोई
तुले ठेसानं भाकर
रावो दसरा दिवाई
शकुनिचे चेले सारे
तुले बोलते पोशिंदा
करून तुले नागडा
जगी करते शर्मिंदा
हाती घेऊन गोफण
सारी हाकल पाखरं
अन्यायाच्या उरावर
आता चालू दे नांगर
-अनिकेत राठोड