मुंबई | महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती दिनानिमित्त खादी व ग्रामोद्योग वस्तुंचे मंत्रालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बुधवार दि. ३ ते शनिवार दि. ६ ऑक्टोबर या दरम्यान मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या आवारातील त्रिमूर्ती प्रांगणात भरविण्यात येणार आहे.
ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या ग्रामोद्योगी वस्तूंच्या या प्रदर्शनात खादी वस्त्र, लाकडी वस्तू, मध, व इतर हस्तकला व गृहपयोगी वस्तू बघायला मिळणार आहेत.
या प्रदर्शनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई हे बुधवारी सकाळी १०.३० वाजता भेट देणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.म.निलीमा केरकेट्टा व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील कारागिरांनी उत्पादित केलेल्या खादी वस्त्र व ग्रामोद्योगी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत विविध उपक्रम राबविले जातात.