आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वांनी भरपूर असणाऱया हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, दुध, अंडी, सुकामेवा विशेषतः बदाम यांचा आहारात समावेश करावा. केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. मासे, सोया, कॉटेज चीझ आणि डाळी यांचा आहारात समावेश करावा. संत्र, पिवळी फळे आणि भाज्यांत बीटा केराटीन आढळते. बी १, बी६, बी १२, सी आणि ए विटॅमिन केसांसाठी पोषक असते.
तळलेले पदार्थ, आंबट, खारट, तिखट, मसालेदार आहाराचे प्रमाण कमी करावे. हवाबंद पदार्थ, जंकफूड, फास्टफूडच्या आहारी जाणे टाळावे. कारण अशा आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वे नसतात.
पुरेसे पाणी वरचेवर प्यावे. यांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
मानसिक ताणतणाव रहित रहावे.
नियमित व्यायाम करावा. यांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. योग्य रक्तसंचारणामुळे केसांची मुळे घट्ट होतात. यांमुळे केस गळण्यासारख्या समस्या होत नाही.
केसांच्या आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्व अत्यंत उपयुक्त असते. यासाठी सकाळच्या कोवळ्या ऊन्हात काही वेळ उभे रहावे.
व्यसनांपासून दूर राहणे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. कारण धुम्रपान, मद्यपानाद्वारे अनेक विषारी घटक रक्तप्रवाहात येत असतात. त्यामुळे इतर आरोग्याच्या समस्येबरोबर केसांच्या समस्यासुद्धा उद्भवतात. धुम्रपान करणाऱया व्यक्तींचे केस लवकर पांढरे होतात.