मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दादर येथील राजगृह येथे प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्यालाच साथ देणार असल्याची त्यांची भूमिका असल्याचे समजतेय. दरम्यान राजू शेट्टी यांच्याबरोबर या भेटीदरम्यान शिक्षक आमदार कपिल पाटील यांचीही उपस्थिती होती.
गेल्यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपला साथ दिली होती. पण शेतकरी विरोधी धोरणांमुळे संताप व्यक्त करत राजू शेट्टी एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, फडणवीस आणि केंद्र तसेच राज्य सरकारवर वारंवार त्यानीं टीका केली आहे.
ADVERTISEMENT