मुंबई | मिनाक्षी शेलार ही महिला प्रसूती काळात ९ व्या महिन्यात डेंग्यू आजाराने त्रस्त झाली. सदर महिलेची एम जीं एम कामोठे येथे तपासनी केली व अतिदक्षता म्हणुन तात्काळ सुपर सेवेसाठी चांगल्या रुग्णलयात नेन्याची शिफ़ारास एम जी एम रुग्णालयाने केली असता रुग्णाच्या नातेवाईकांनी वाशी येथिल हीरानंदानी fortis रुग्णालय गाठले व मिनाक्षी करिता एकंदरित ख़र्चाचा तपशील घेतला. त्याप्रमाणे २.५ लक्ष रुपये १० दिवसाच्या राहणी व औषधपचारित ख़र्च हीरानंदानी fortis प्रशासनाने मीनाक्षिच्या नातेवाईकांना दिला आणि मीनाक्षी शेलार रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली.
मिनाक्षी च्या नावे मेडिक्लेम पॉलीसी असल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी उपचारार्थ खर्चास होकार दर्शविला परंतु मागील तीन ते चार दिवसापासुन हीरानंदानी fortis प्रशासनाने ६.५ लाखाचे बिल मीनाक्षिच्या माथी मारुन तो भरन्याचा तगादा लावला असता मिनाक्षीच्या नातेवाईकांनी पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्या कड़े धाव घेतली व पालकमंत्री महोदयांनी मिनाक्षीला रुग्णालयीन बिलात सवलत देण्याकरिता विनंती पत्र दिले असता त्याची दखल घेण्यास टाळाटाळ केली..सदर गंभीर बाब लक्षात घेवुन आज शिवसैनिकांनी श्री. संजय म्हशिलकर ( उपाध्यक्ष- भाविसेना) श्री. विट्टल मोरे – ज़िल्हाप्रमुख, श्री. विजय माने- शहरप्रमुख ह्यांच्या नेतृत्वाखाली धड़क दिली असता रुग्णालय प्रशासनाने मीनाक्षिचे सर्व थकबाकी माफ़ केली व अतिरिक्त घेतलेले ३५०००₹ हि परत केले.. या आंदोलनात उपज़िल्हाप्रमुख – अतुल कुलकर्णी , संतोष घोसालकर, मिलिंद सूर्यराव, नगरसेवक- काशीनाथ पवार ,ज्ञानेश्वर सुतार, उपशहरप्रमुख- एकनाथ दूखंडे, प्रकाश चिकने सोबत मी सहभागी झालो व मिनाक्षीची fortis रूग्णालयातुन सोडवणुक केली.