मुंबई | केईएम रुग्णालयातील विनिता विजय तोरसकर(वय वर्षे ६५) ह्या महिलेने गेली ३७ वर्षे केईएम मध्येच परिचारिका सेविकेचे इमानेइतबारे काम केल्यानंतर वृद्धावस्थेत तिला आज मोठ्या संघर्षास सामोरे जावे लागत आहे.त्यांच्या पतीचे अकालीच कर्करोगामुळे निधन झाले.पण तिच्यामागचे शुक्लकाष्ठ काही केल्या जाईना.आपल्या सेवाकार्यात ह्या परिचारिकेने अनेको पुरस्कार प्राप्त केले,कित्येकांची वाहवा मिळवली. मात्र निवृत्तीनंतर पालिकेच्या सेवानिवासस्थानात चार वर्षे राहण्याचे रु.२७९१९१०/-लाखांचे निवासी भाडे भरण्यासंदर्भाचे एकपानी भाडेवसुलीपत्रकच त्यांना पालिकेने धाडले आहे. रुग्णालयामध्ये जोपर्यंत सेवा केली, तोपर्यंत १६६ रुपये खोलीचे भाडे लावले. त्यानंतर चार वर्षे जास्त त्या राहिल्या म्हणून २७९१९१० लाखांची थकबाकी मागितली.ह्या ४ वर्षात आपल्या स्वतःच्या हक्काच्या ग्रॅज्युयिटी बरोबर प्रशासनाने ‘वनथर्ड पेन्शन’ व ‘हाफ पे’ व ९१ दिवसाचा पगार सुद्धा थकवलेला आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.
विनिताताई म्हणतात “मी आजतागायत ४० वर्ष ह्या केईएम रुग्णालयात प्रामाणिकपणे काम केलय. काहीतरी विशेष प्राविण्य माझ्याकडे असल्यामुळेच सर्व परिचारिकांमध्ये माझी पुरस्कारासाठी निवड झाली,त्याचीच पोचपावती म्हणून बरेचसे पुरस्कार देखील मला पालिकेने दिले,त्याबद्दल मी पालिकेची आभारी आहे,पण अशा एका नोटीस पत्रामुळे आज माझी मात्र घोर निंदा झालीये,आज माझ्या जागी दुसरे कुणी असते,तर त्याने आत्महत्या केली असती,पण मी न्यायहक्कासाठी लढणार,” मनसेच्या नितिन नांदगावकरांकडे हा प्रश्न सुटण्याच्या अपेक्षेने आल्याचे त्यांनी सांगितले.मध्यंतरी ह्याच सरकारी दवाखान्याच्या आवारात गत ३५ वर्षापासून बिनदिक्कत पणे खुलेआम उघडे बाबांचा दरबार भरल्याची बातमी झीने उघडी केली होती.म्हणजे एकीकडे भोंदूबाबा पोसायचे,अन दुसरीकडे जिने आपलं आयुष्य दवाखान्याच्या सेवेकरता घालवली,तिची मात्र नाहक उपेक्षा करायची…काय ही पालिकेची अजब रीत….दरम्यान मनोरा,आकाशवाणी ह्या आमदार निवासांमध्ये ९४ आमदारांनी घरभाड्याचे ४ कोटी थकवल्याची बातमी लोकमतने उघडकीस आणलेली, त्यापैकी ३ कोटी विधिमंडळ सचिवालयाकडून माफही झालेले.आत्ता ह्यावेळेस प्रशासन नेमकी कुठली भुमिका घेतय,हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.