मानखुर्द | शिवसेनेच्या तुकाराम कातेंवर प्राणघातक हल्ला झाला,पण त्यांच्यावर झालेला हल्ला परतून लावण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली,ती शिवसैनिक किरण सावंत यांनी.
हल्ला होत असताना स्वतःच्या नेत्याला वाचविण्यासाठी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे आज शिवसेनेतून व स्थानिक विभागातून त्यांचे कौतुक होत आहे. आमदार तुकाराम कातें मानखुर्द-महाराष्ट्र नगर येथील देवीच्या दर्शनाला आले असताना दर्शन करून बाहेर बसले असताना अचानकच हा प्रसंग घडला.तलवारीने हल्ला होत असताना कार्यकर्त्यांसमवेत बाजूस उभे असणारे किरण सावंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता तलवार उगारणार्यास पकडून त्याला मागे खेचत नेले.ह्या झटापटीत किरण सावंत यांच्या हाताला जखम झाली आहे.आत्ता उपचारानंतर किरण सावंताची प्रकृती स्थिर आहे.
ह्याप्रसंगाबाबत किरण सावंत म्हणतात,”लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या न्यायाने मी वागलो,तुकाराम काते साहेबांचे खूप मोठे योगदान आहे.मी तर केवळ एक निमित्त होतो,बाळासाहेबांनी माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना घडवलय, अंगात शिवरायांचे रक्त अन्यायाविरूद्ध गप्प बसू देत नाही,उद्या कुठेही अन्याय होत असेल तर पुढे काय होईल,असा विचार करत षंढासारखा गप्प बसून राहणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक मुळीच नाही,शिवसेना माझे कुटुंब आहे,आणि माझ्या कुटुंबातल्या माणसावर हल्ला होत असताना मी गप्प कसा राहू.ह्याच वारश्यामुळेच आज मी हे प्रसंगावधान दाखवू शकलो.”