पूर्वी राजे महाराजे आपल्याकडील संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी दवंडी पिटवित् असत.हा दवंडी देणारा जातीने हजर राहून जश्याच्या तश्या स्वरुपात तो ती देत असे .म्हणून त्या काळी त्याचे महत्व लोक ओळखून असत .आज आधुनिक काळी जसे संदेश बदलले तशी ती नेणारी साधनेही बदलली .पत्रकांचे त्यांना स्वरूप येऊ लागलं.ही पत्रके सुद्धा विना शारीरिक परिश्रमा खेरीज जनतेपर्यंत पोहचत नसे,आजच्या काळात उद्योग ,शिक्षण ,संस्कार,राजकारण,समाजकारण,अर्थनीती यांना प्रोत्साहन सुद्धा ही आजच्या काळात असणारी वर्तमानपत्रे देतात .शासनाविषयी संस्कृतीविषयक ,सामाजिक
उपक्रमाविषयक माहिती जनतेपर्यंत पोहचविण्या साठी वर्तमानपत्रांना चांगल्यात चांगले तंत्रज्ञान वापरून छापावी तर लागतातच, पण त्याही पेक्षा ती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शारीरिक मेहनत ही घ्यावीच लागते,इंटरनेट च्या जाळ्यात काही सगळेच जात असतात असे नाही म्हणून आजच्या घडीला सुद्धा वर्तमानपत्राचे साम्राज्य अबाधित आहे.अत्यंत कमी वेळात वर्तमानपत्र छापुन झाल्यानंतर साधारण ४ तासांच्या आत ते विक्रेत्यांकडे पोहचवणे गरजेचे असते नाही तर त्याची रद्दी होते ,हे माहित असल्यामुळेच चांगल्या प्रकारचे वितरण ,आणि त्यासाठी चांगले वितरक कंपनीला
नेमावे लागतात.सकाळी पहाटेच उठून ती विविध
भाषांची ,विविध किमतींना असणारी ,विविध
वितरकांकडे असणारी वर्तमान पत्रे विक्रेत्यास अत्यंतकमी वेळात जागच्या जागेवर पैसे मोजून खरेदी करावी लागतात ,त्यामुळे चलाखपणा ,हिशोबि वृत्ती, ,चाणाक्षपणा हा नित्याचाच असतो तो ही पहाटेच म्हणजे अपुरी
झोप राहिली तर गणित चुकलं समजायचं;हिशोबाचही आणि आरोग्याचही, ही धावाधाव करून घेतलेली वर्तमानपत्रे वेळच्या वेळेस असलेल्या ठिकाणी म्हणजे
प्रत्येक इमारतीगणिक आणि घरांगागणिक टाकावी लागतात ,त्यातही मोठी कसरत ज्याला
जो पेपर हवा तो त्यालाच मिळावयास हवा .एखाद्या
कन्नड वाचणाऱ्याला तेलगु देऊन कसं चालेल? किंवा त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे एखाद्या राजकीय पक्षप्रेरित
वर्तमानपत्र असेल तर दुसरे देऊन कसे चालेल ? आणि समजा चुकून गेलीच तर भांडणे नित्याचीच ,त्यामुळे भांडणाकडे फारसे लक्ष न देता एकाग्र होऊून काम करणे आलेच ,शारीरिक मेहनती सोबत मानसिक परिश्रम आणि
बौद्धिक स्थिरता आलीच ,त्याचबरोबर वेगवेगळ्या
संस्कृतीतल्या माणसांशी जुळवून घेण्याचा व्यवहार कुशलपणा आलाच .हे सर्व पहाटेच करायचे म्हणजे उपाशीपोटीच!!
कमालीची थंडी असो ,पाऊस
असो,वा दुपारचे कडक ऊन असो, येथे परिश्रमाला पर्यायच नाही,लोक कितीही म्हणोत इंटरनेटचा युग आलय, वाचकवर्ग घटतोय, पण वास्तव परिस्तिथी झुगारून चालणार नाही ,दिवसाला लाखोगणिक वाचकवर्ग सद्या नावाजलेल्या वर्तमानपत्रांना भेटतोय
विविध कंपन्यांना ,शासनाला राजकीय पक्षांना ,सामाजिक
कार्यकर्त्यांना, संस्कृती रक्षकांना व्यापक स्तरावर एखाद्या गोष्टीची माहिती देण्यासाठी,
जाहिरात करण्यासाठी,साधन मिळतंय हे खरं !! याचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल,
विक्रेत्यांना आपण इतक्या व्यापक संकल्पनेशी
जोडले गेलेलो आहोत, याची स्पष्ट कल्पना फारच कमी जणांना आहे किंबहुना नाहीच असच म्हणावे लागेल .केवळ किमतीच्याच खेळात,व जाणीवेत खेळत राहिलेला सद्याचा विक्रेतावर्ग आपणास दृष्टीस
पडतो ,सामाजिकतेचं भान काही अंशाने तरी
वाढलय का ? हा प्रश्न अन्नुत्तरितच राहतो .कारण फक्त एकच तशी कल्पना व भान देणे हे समाजाने तरी नाकारलंय किंवा वर्तमानपत्र च्या कंपन्यांनी ?म्हणूनच ह्या व्यवसायाची प्रतिष्टा दिवसेंदिवस खालावताना दिसतेय ,म्हणूनच “पेपर विक्रेता”म्हणवून घेणं हे
बहुतेक जणांना उपेक्षितच वाटतं,जणू काय एखादी जातच!!,म्हणूनच पेपर विक्रेत्यांची मुले भले ह्या
व्यवसायात कमाई असो तरी ते तो व्यवसाय करताना दिसत नाही,उत्सवाच्या काळात ठराविक वेळेसच वर्षातून ४ वेळेस ह्या विक्रेत्यांना सुट्टी असते .गणेशोस्तव ,होळी ,२६
जानेवारी ,दिवाळी बाकी १२ ही महिने सदोदित
जळतच राहून वाचकांची भूक मिटवण्याची जबाबदारी पेलावी लागते.हल्ली प्रत्येक वर्तमानपत्र हे स्वतः
किती श्रेष्ट आहे हे दाखविन्यासाठी स्पर्धात्मक दृष्टीकोन ठेवते,परिणामी किमतीच्या पद्धतीत ,विक्रेत्यांच्या विक्रीतही स्पर्धा उभी राहू लागली आहे .धंदेवाईक स्वरूपच मुख्य उद्देश आला तर मग बाकी सर्व गोष्टी गौण ठरतात संस्कृती ,सामाजिक भान जिज्ञासापूर्ती ,प्रेरणादायी,आदर्शवत
चारीत्र्यशील अश्या लिखाणाची जागा बातमीवजा अवास्तव जाहिरातींनी घेतली जाते.
अर्थात त्या असाव्याही त्यात दुमत नाहीच परंतु
मर्यादा सांभाळून, अन्यथा त्या निंदनीय मानाव्यात ,घरात आईला विशेष मान आहे
परंतु ती जेवण बनवते म्हणून मान आहे असे
नाही ,उद्या तिने नाही जेवण बनविले तरी ती
आईच आहे ,आणि कितीही आजारी असली तरी
ती देईलच .प्रश्न इथे असा पडतो कि तिच्याविषयी आपण किती कृतज्ञ राहतो.केवळ बोलून नाही तर तिच्या सारखे काम करून नेमका हाच दृष्टीकोन इथे अपेक्षित आहे ,वाढलेल्या स्पर्धा ,त्यातून एकमेकांवर
होणाऱ्या कुरघोडी ,कुठल्याही थराला जाऊन अंक विक्री करण्याची धडपड यात खरी मेहनत होतही असेल,नाही असं नाही पण ते प्रयत्न ,ती मेहनत सार्थकी लागली का
?याचाही विचार इथे प्रकाशकांना ,विक्रेत्यांना ,वाचकांना
करावा लागेल.
आज ह्यात सर्वाधिक महत्वाचा कुठला जर प्रश्न असेल,तर तो वृत्तपत्र विक्रेत्यांचा.वर्षानुवर्षे वर उल्लेखलेली मेहनत करूनही वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वत:च्या हक्काची जागा तर नाहीच, पण साधी नोंदणी पण नाही.खालावत चाललेल्या व्यवसायाला हे एक कारण आहे.त्याच कारणामुळे नवपिढीचे ह्याकडे दुर्लक्ष होतय.गजेंद्र अहिरे,अब्दुल कलाम,सुशीलकुमार शिंदे वैगेरे अशा नामवंत व्यक्ती हा व्यवसाय करूनच त्यांना प्रगतीची दिशा भेटली.आज जरी संदेशवहन मोबाईल-इंटरनेटमुळे वाढले असले तरी हा व्यवसाय टिकावा,वाढावा,बहरावा अशी अपेक्षा समाजस्तरातून व्यक्त होतेय,त्यासाठी स्वतंत्र महामंडळ करून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी,अनुदान,पाल्य शिक्षण,आरोग्यविषयक सुविधा,राखीव घरे तत्सम प्रश्न मिटावेत,म्हणून सरकारदरबारी घाट घातला जातोय,तो मार्गी लागावा,ही अपेक्षा,आणि पुनश्च वृत्तपत्र विक्रेता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संतोष राजदेव