मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी एसनडीटी विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेल मध्ये विद्यार्थिनीला तोकडे कपडे घातल्यामुळे वॉर्डन रचना झवेरी यांनी एका वसतिगृहातील मुलीला नग्न केले. अशी विकृत घटना आजच्या एकविसाव्या शतकात घडते आणि तेही पुरोगामी महाराष्ट्रच ही फार दुर्दैवच गोष्ट आहे…
यापूर्वी SNDT विद्यापीठात असे प्रकार घडले आहेतया घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थी भारती संघटनेने शॉर्टपँट घालुन चर्चगेट येथील SNDT विद्यापीठासमोर निषेध नोंदविला. या संघटनेने मोहीम आखली. #आमच्या_कपड्यांवर_आमचा_अधिकार
यामोहिमेेत मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी होऊन या घटनेला आपला निषेध नोंदवूया असे आवाहन विद्यार्थी भारतीच्या राज्य विद्यापीठ कार्यवाहक साक्षी भोईर यांनी केले. एकी कडे #me_too ही मोहीम जगभर चालू असतानाच महिलांच्या सक्षमीकरणवरं जागृती केली जाते व एकी कडे ह्या असा किळसवाणा प्रकार घडतो ,आम्ही काय खाणार,पिणार,घालणार हे ठरवणारे हे लोक कोण? असा सवाल विद्यार्थी भारतीच्या राज्य विद्यापीठ अध्यक्षा पूजा मुधाने यांनी केली
या अशा विकृतांना शिक्षा झालीच पाहिजे
तसेच रचना झवेरी यांना निलंबित करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असे मत विद्यार्थी भारती संघटनेच्या राज्य कार्यवाहक श्रेया निकाळजे यांनी मांडले. विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी या मुलींच्या अधिकारावर गदा आणत असून त्यांना निलंबित करून महिला आयोगाने या बाबतीत तातडीने चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थी भारतीच्या राज्यअध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केली तसेच यासंदर्भात विद्यार्थी भारती संघटना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली असता लवकरात लवकर वॉर्डन रचना झवेरी यांना निलंबित करण्याचे आश्वासन दिले व कुलगुरू वंजारीचे यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
– आनंद बनसोडे