मुंबई | २४ ऑक्टोबर जगभरात पोलिओ निर्मुलन दिन म्हणून साजरा केला जातो. पोलियो हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा कोणताही उपाय नाही मात्र, योग्य वेळी लसीकरण केल्यास यापासून वाचले जाते.
भारतातून पोलिओ हद्दपार झाला असल्याचं ‘जागतिक आरोग्य संघटने’नं (डब्ल्यूएचओ) २०१४ मध्येच जाहीर केलं असलं तरी पाच वर्षांच्या आतल्या बाळांना पोलिओचा डोस देणं आवश्यक आहे. पोलिओची लस जशी तोंडावाटे दिली जाते तशीच टोचण्याचीही पोलिओ लस देखील निघाली असून या दोन्ही लशींचा पोलिओपासून संरक्षण देण्याच्या कामात महत्त्वाचा वाटा असतो.