राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोड केली आहे.
यंदा दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये ‘बहीणबीज’ (भाऊबीज) त्यांनी मंजूर केली असून लवकरच सेविकांच्या बँक खात्यात ही भेट जमा होणार आहे. सुमारे २ लाख ७ हजार ९६१ अंगणवाडी सेविकांना ही भेट मिळणार आहे.