ठाणे | महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या लघु पाटबंधारे विभागाच्या झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी दि. २५ ऑक्टोंबर, गुरुवार पासून पुढे दर ७ दिवसांनी गुरुवार रात्री १२.०० ते शुक्रवार रात्री १२.०० वाजेपर्यंत २४ तास पाणी बंद राहणार आहे. २५ ऑक्टोबर, रोजी रात्री १२.०० ते शुक्रवार २६ ऑक्टोबर, रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या उपनगरात पाणी पुरवठा राहणार ठप्प
ठाणे शहरातील कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा कोस, डायघर, देसाई इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे, फायर ब्रिगेड, बाळकूम पाडा क्र.१ या भागात पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या पाण्याच्या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.