मुंबई | रेल्वेच्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात मुंबई आणि मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर तब्बल १८,४२४ लोकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहे. तर या पाच वर्षात अपघातात जखमी झालेल्यांची संख्याही मोठी आहे. जवळजवळ २० हजार लोक रेल्वेच्या अपघाताने जखमी झालेले आहेत.
रेल्वे रुळ ओलांडताना, लोकलमधून तोल जावून, गर्दीमुळे, शाळेतील मुलं स्टंटमुळे, खांबाला धडक लागून अनेक लोकं मृत्यू पावली आहेत.