यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि आर्णी तालुक्यातील दोन शेतक-यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुःखद घटना बुधवारी घडली. आर्णी तालुक्यातील शिरपूरच्या भाऊराव रामदास राठोड यांच्यावर मध्यवर्ती बॅंकेचे ५५ हजारांचे कर्ज होते. सतत होत असलेल्या नापाकीमुळे भाऊराम राठोड यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.
पुसद तालुक्यातील कोंडू रामसिंग राठोड यांनी कोरडवाहू शेतात काहीच पिकत नसल्याने स्वतःच्याच शेतात विष घेतले. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय नेत असताना कोंडू राठोड यांची प्राण ज्योत मावळली.