“इस देश को वही ५ सालसे फॅमिलीझ चला रहीं है,टाटाझ,बिर्लाझ,अंबानीझ,रूईआझ,वाडीयाझ,थोडा तो गेम चेंज होना चाहीए न”…..कोठारीझ….
‘बाजार’ चित्रपटाच्या प्रोमोमधलं सैफ अली खानच्या तोंडचं हे वाक्य नक्कीच उत्कंठा वाढविणारं आहे.आत्ता कोठारीझ ची सर्वात मोठी डील व्हावी,म्हणून त्यासाठी अमर्याद महत्वाकांक्षा ठेवणारी आणि ती महत्वाकांक्षा प्रत्यक्षात अमलात आणणारी शकुन कोठारीची(सैफ अली खान)ची व्यक्तिरेखा आलीच.शेअरबाजारातील उलाढाल,निर्देशांकाच्या चढउतारामागचे राजकारण,रिस्क केअरिंग कॅपॅसिटीची मर्यादा ओळखून वेळीच आर्थिक फायद्यासाठी घेतलेला अचूक निर्णय,कमालीची निर्णयक्षमता,त्यासोबत संधिसाधु वृत्ती,भावशुन्यता,माहितीशोध,अस्तित्वसंघर्ष ह्यासारख्या गोष्टी एका कथेतून मांडलेला एक चित्रपट म्हणजे ‘बाजार’.
शेअरबाजारात पदोपदी आव्हानात्मक निर्णयासाठी गाठीशी असणारा यशापयशातला अनुभवच कामी येतो.भलभले बुद्धीमान येऊन येथे प्रगती साधतीलच असे काही नाही.प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेतले गुणवंत विद्यार्थी येथे यशस्वी होतीलच असेही नाही.शकुन कोठारी सारख्यांचा अंगाडीया(जोखीम घेऊन जाणारा अथवा पोहचवणारा)पासुन तर एका बिग डिलर पर्यंतचा प्रवास येथे रेखाटलाय.महत्वाकांक्षेच्या जोरावर नीती-अनीतीचा विचार न करता येन केन प्रकारेण तो यशाच्या शिडीसाठी कुठलाही धोका पत्करून यशस्वी व्हायला नेहमी तयार असतो.यशासाठी मैत्रीपुर्ण संबध,कौटुंबिक भाववाही संबध यांच्याही लाईनझ क्राॅस करणारा शकुन कोठारी ह्या चित्रपटाने रेखाटलाय.रिझवान अहमद सारखा उमदा तरुण भेटल्यावर त्यालाही खुबीने वापरून आपली पोळी भाजून घेतो.पण नंतर हाच तरुण त्याची पोलखोल करतो.आणि मैत्री संबधाला वापरून स्वतःचं बस्तान बसवणा-याला चांगलीच चपराक बसते.व्यापारासाठी शेअरबाजारात बिग डिलरची प्रायव्हसी मेन्टेन राहत नाही,मग भले ती कसोशीने जपण्याचा प्रयत्न केला तरीही.लहान मुलांचाही सोशल मिडियावर ट्रोल करून वापर केला जातो.स्वतःचं कौटुंबिक आयुष्य उध्वस्त होतच,पण मैत्रीपुर्ण संबधसुद्धा दुरावतात,अवघं आयुष्य आर्थिक लेन-देन व्यवहार होऊन जातं.हे शकुन कोठारीच्या व्यक्तीरेखेद्वारे ह्या चित्रपटात उत्तमरित्या दाखवण्याचा प्रयत्न झालाय.बाजारात डिलींगसाठी नवीन कर्मचारी आल्यानंतर त्याला दिलं वा पेलावं लागणारं आव्हान,त्याची आव्हान पेलण्यासाठीची धडपड रिझवान अहमद सारख्या व्यक्तीरेखेने साकारलीये.इलाहाबाद सारख्या शहरातून मुंबईत यशस्वी होण्याच्या महत्वाकांक्षेने आलेल्या ह्या उमद्या तरुणाचा अस्तित्वसंघर्ष प्रवासही उत्तमरित्या दाखवलाय.
“दुनिया इमोशन्सपें चलती है,और मैं मॅथ्सपे चलता हु”शकुन कोठारीचं हे व्यापारतत्व व इमोशन्स वर चालणा-या रिझवान अहमदचं’स्माॅल टाऊन मेन्टॅलिटीचं’ सुत्र ह्यातला संघर्षही छान साधता आलाय.सेबीच्या(security exchange board of india)मर्यादाही स्पष्ट केल्यात.थोडक्यात काय तर पैश्यासाठी कुठल्याही स्तराला जाणारी माणसे हे जगापासुन खुप दूर जातात.भाववाही संबधाचा गळा घोटुन जीव गुदमरल्यासारखी परिस्थिती उद्भवते.ह्या सगळ्यात विशेष म्हणजे” आदमी को अपने जडोंको कभी भुलना नहीं चाहिए|”हे शकुनच्या तोंडचं वाक्य.इतका मोठा डिलर झाल्यावरही एका साध्या हाॅटेलात ६० रूपयाची थाळी खाताना त्याच्या तोंडून रिझवानबरोबर संवादादरम्यान आलेले हे वाक्य .यशासाठी मुंबईत आल्यावर रिझवान अहमद ६ महिने आपल्या कुटुंबीयांपासून दूर असल्याचे कळल्यावर त्याला दिली जाणारी सुट्टी.शकुन म्हणतो,” मैं क्यों आता हु,ये ६० रूपये की थाली खाने के लिए मालुम है तुझे,मुझे वापीस कभी भी ऐसे घटिया थाली में नहीं खाना चाहता,ये याद रहें इसलिए” हे संवाद भाव खाऊन जातात.
सध्या शेअरबाजारात गुजराती वर्ग जास्त असल्याने चित्रपटास गुजराती टच देण्याचा प्रयत्न झालाय.गाणी फारशी श्रवणीय नसली तरी छोड दिया……हे गाणं छान झालय.राधिका आपटे(रिझवानची प्रेयसी व साथीदार),चित्रागंदा(शकुनची बायको) रिझवान अहमदला मदत करून कोठारीला धडा शिकवतात.पण हाच शकुन कोठारी सजा भोगुन आल्यावर पुनश्च आपल्या तत्वानिशी शेअरबाजारात डिलींग करायला सरसावल्याचे दाखवताच चित्रपटाचा’ द एण्ड’ होतो.अर्थात ह्यातल्या भरपूर गोष्टी प्रेक्षकास विचार करायला भाग पाडतात.सुरुवातीला रिझवान अहमद नोटाश्रीमंतीसाठीच्या आकांक्षेपोटी स्वतःच्या बापाचेही न ऐकता इलाहाबादमधुन मुंबईत येतो.पण चुकीच्या गोष्टीसाठी स्वतःच्या बापाने मारलेली थप्पड त्याला शकुन कोठारीला अटक झाल्यावर आठवते.व तो म्हणतो.”कभी कभी चांटा लगाना भी जरूरी होता है|”.शकुन कोठारीसारखी कुठल्याही स्तरावर(buy,borrow & steal)जाणारी माणसे कमी नाहीयेत ह्या जगात.पण आलेला पैसा सन्मार्गानेच येतो का?हा विचार करण्याची कुवत ज्याच्यांकडे आहे,अश्या धर्मपत्न्या वर्षानुवर्षे कोंडमारा सहन करीत अबोल राहुन एकप्रकारे अशा प्रवृत्तीला अनुमोदनच देत असतात.पण कुठेतरी जाऊन निर्णय हा घ्यावाच लागतो,अन्यथा ह्या रहाटगाडयात कित्येक जण भरडण्याची शक्यता अधिक असते.शकुनची बायको चित्रागंदा हा निर्णय घेऊन स्वतःच्या नव-याला अद्दल घडावी,म्हणुन रिझवानच्या साथीने मदत घेते व स्वतःच्या मुलींना शकुनपासून घेऊन जाते,हे दिशासूचक आहे.नव-याच्या कमाई कोठुन आली याचा विचार करणा-या स्त्रीला हे एकप्रकारचे शिक्षणच आहे.आपल्या नवरोबाची कमाई सन्मार्गानेच यायला हवी,ह्याची खातरजमा गृहलक्ष्मीने केली नाही तर अनर्थ ठरलेलाच,हेच खरं.
– संतोष राजदेव