पुणे | राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक शहर अर्थातच पुणे. पुण्याला शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, आता या शहराच नामातंर करुन जिजापूर नाव द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने याविषयी राज्य शासनाला पत्र पाठवून प्रस्तावावर लवकर पाऊल उचलण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या शिवसेनेच्या नामातंर करण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्याबरोबर पुण्याचेही नामातंर करुन राजमाता जिजाऊचे नावे देण्यासाठी आम्ही शासनाला पत्र दिले आहे. असे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यावेळी म्हणाले.