मुंबई | आपल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय पटलावर नेहमी अग्रस्थानी राहणारे, त्यासोबतच उत्तर भारतीयांच्या विरोधात नेहमी आक्रमक पवित्रा घेणारे राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. कांदिवली येथे होणा-या कार्यक्रमाचे निमंत्रण राज ठाकरे यांनी स्वीकारले आहे अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
दरम्यान, कांदिवलीच्या भुराभाई हाॅलमध्ये उत्तर भारतीय पंचायतच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २ डिसेंबरला होणा-या उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर राज ठाकरे जातील का हे पाहणं औचित्याचं ठरेल.