मुंबई | इमारत बांधकाम कामगार, बंदर कामगार, नाका कामगार अशा अनेक असंघटित कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे आवाज उठविणाऱ्या अॅड. नरेश राठोड यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. लवकरच संत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
दरम्यान, या कामगार महामंडळामुळे सर्वसामान्य कामगाराला, असंघटित कामगाराला न्याय मिळेल. यासंदर्भात धोरणात्मक अंमलबजावणी करण्याची अत्यंत गरज आहे.असे सामाजिक कार्यकर्ते अॅड. नरेश राठोड म्हणाले.