मुंबई आणि नागपूर या दोन महानगराला जोडण्यासाठी आणि महाराष्ट्राचं दळणवळण वाढविण्यासाठी भाजपा सरकारच्या वतीने समृद्धी महामार्ग प्रकल्पाची सुरुवात झाली. मात्र, या महामार्गाला नाव देण्यासाठी राजकीय पक्षात ओढाताण होताना दिसत आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तर या महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्या अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते करत करत आहेत.
तर दुसरीकडे हा महामार्ग शेतक-यांच्या शेतातून जात आहे. त्यामुळे शेतक-यांचे नेते हरित क्रांतीचे प्रणते वसंतराव नाईक यांचे नाव या समृद्धी महामार्गाला देवून शेतक-याचे सन्मान सरकारने करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप चव्हाण जिंतूरकर यांनी केली आहे.
“महाराष्ट्राच्या जडणघडणात वसंतराव नाईकांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना त्यांनी राबवलेल्या औद्योगिक धोरणांमुळेच महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. त्यामुळे नाईकांनी दिलेल्या योगदानाला विसरता येणार नाही.”
संदीप चव्हाण जिंतूरकर, सामाजिक कार्यकर्ते