मुंबई | स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई असं मुंबईच ब्रिद वाक्य असणा-या मुंबईत आज चक्क कचराचा ठिंग लागलाय. आणि मुंबईत कच-याचं साम्रज्य पसरलंय. काही दिवसांपासून पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण मुंबईतल्या सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. यामुळे मुंबईकरांना कचराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने ते कामबंद आंदोलन करत आहे.
शहरातील आज कचरा उचलला जाणार नाही. मुंबईमध्ये आज कचराचा परिणाम दिसणार आहे.
पश्चिम उपनगरातील तीन विभागातून या कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली होती.आता हळूहळू संपूर्ण मुंबईतून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.