नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या ६४व्या वरिष्ठ राज्य बॉल- बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याचा पुरुष संघ उपविजयी झाला. औरंगाबाद, गडचिरोली, नवी मुंबई, अहमदनगर या संघाचा पराभव करून चुरशीच्या सामन्यात गतविजेते बलाढ्य वर्धा या संघाचा पराभव करून ठाणे जिल्हा संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत अनुभवी चंद्रपूर संघाचा पराभव करून संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत ठाणे जिल्हा संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. संघाला ठाणे जिल्हा सचिव प्रा. श्रीराम पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले. ठाणे जिल्हा संघात केतन इंदुलकर, पियुष झेंडे, रवी आवर, किरण शेट्टी, सचिन राठोड, मंगेश तिवारी, रोहित यादव, पियुष धुरडे, विपुल पटणे, हिमांशू पांडे यांचा समावेश होता.
संघाचे प्रशिक्षक म्हणुन आदित्य रमेश यांनी संघाचे कामकाज पाहिले तर व्यवस्थापक म्हणुन ऋषिकेश राऊत यांनी स्पर्धेदरम्यान संघाचे व्यवस्थापन केले. संघाचे कर्णधारपद सचिन राठोड यांनी भूषविले. ठाणे जिल्हा संघाने उत्कृष्ट खेळ करून ही कामगिरी केली आहे जिल्हा संघटना, सर्व प्रशिक्षक, व्यवस्थापक, वरिष्ठ खेळाडूंचे भरीव योगदान या यशामागे आहे असे सचिन राठोड यांनी यावेळीं सांगितले. लवकरच ठाणे जिल्हा संघटनेच्या वतीने ग्रामीण भागांतील युवकांना बॉलबॅडमिंटन खेळांचे प्रशिक्षण मिळावे म्हणुन आम्हीं प्रयत्न करणार आहोत असे केतन इंदुलकर यांनी यावेळीं सांगितले.