लहानपणी प्रत्येकाने लगोरी हा खेळ नक्कीच खेळला असेल आणि हाच महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जात आहे. २३ ते २५ नोव्हेंबर चंदीगड येथे लगोरीच्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत आणि या स्पर्धेसाठी बेडीसगाव, वांगणी येथील खेळाडु आपल्या कुशल खेळांची चमक क्रीडाप्रेमींना दाखवणार आहेत. यापूर्वी राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे बबलू रमेश पारधी, रविंद्र भाऊ शिंगवा, अभय आनंदा वळवी, प्रतीक अंबो गावंडा, उत्तम चंद्रकांत दरवडा, देवेंद्र पालु निरगुडा, सुरज रविंद्र काळे, रितीक जुगलकिशोर चौधरी, अविनाश चंद्रकांत उघडा, रवी अशोक चौधरी हे खेळाडु स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
बेडीसगाव, वांगणी परिसरात साद फाउंडेशनच्या माध्यमाने शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रांत सातत्याने काम चालु आहे साद फाउंडेशनच्या मदतीनेच हे खेळाडु राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी गावांतील मंडळी, खेळाडु आणि सादचे कार्यकर्ते अथक मेहनत घेत आहेत आमचे खेळाडु नक्कीच चांगली कामगिरी करतील असा विश्वास प्रदीप कुलकर्णी यांनी बोलुन दाखवला.
खेळांसाठी लागणारी चपळता आणि फिटनेस आमच्या खेळाडुकडे आहे ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी ग्रामीण भागातील खेळाडुचा राष्ट्रीय पातळीवरील सहभाग नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रशिक्षक स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.