आत्म्याला मित्र बनवतो देहाची काशी होते
बापाला घास भरवतो अश्रूंना फाशी होते
शेतावर माझ्या पाउस पडल्यावर राख उचलली
कित्येक दिवस बाबाही राखेत उपाशी होते
मी गोड बोलण्यापेक्षा मध गोळा करतो भेटुन
माझ्या असल्या सवयीने माझी मधमाशी होते
एक तुझ्या असण्याने माझे जगणे होते सोने
एक तुझ्या नसण्याने माझे युध्द मनाशी होते
फांद्यांना तोडुन माझ्या, सावली पोरकी होते
‘जळजळते हृदय उन्हाने, अन आग बुडाशी होते ‘
घरट्याची चूल जरीही ती आहे पण, वेळेवर
ती लक्ष्मीबाई होते अन घरटे झाशी होते
संबंध नको माझाही कुठल्याही अंधाराशी
माझे नाते फक्त उगवणा-या सूर्याशी होते
मी शब्द सारथी होतो आलो अन निघून गेलो
मी जे जे लिहून गेलो ते ते अविनाशी होते
– एजाज शेख