आजपासून मुंबईत विधीमंडळचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मराठा समाजासाठीचा आरक्षणाचा कायदा अधिवेशनात मांडण्याचा आव्हान राज्य सरकार पुढे आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. धनगर समाजाची TISS च्या अहवालाबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे.मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ही यावेळी मांडण्यात येणार आहे.
दुष्काळाची चर्चा या अधिवेशनात होणार आहे.उत्तर महाराष्ट्र-मराठवाडा पाण्याची समस्या या मुद्द्यांवर सुध्दा बोलण्यात येणार आहे.अर्थातच दुष्काळ समस्या अशा मुद्द्यांवरही विरोधक बोलणार आहे.
त्यातच सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यांवर बोलणार आहे.