वाहतुकीचे नियम भंग करणं आता चांगलीच महागात पडणार आहे. आता वाहतुकीचे नियम तोडणा-यांवर कडक कारवाई होणार आहे. वाहतुकीच्या नियम भंग करुन वाहन चालविणा-या चालकाचे लायसेन्स तीन महिन्यासाठी रद्द करण्यात येणार आहे. यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालक यांनी ट्राफिक विभागाला कारवाईचे निर्देश दिले आहे.
दरम्यान, सिग्नल न पाळणा-या, दारु पिऊन गाडी चालविणा-या, मोबाईलवर बोलत गाडी चालविणा-या मर्यादेपेक्षा जास्त वजन नेणा-या वाहन चालकाला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे यापुढे वाहन चालविताना काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळावे लागणार हे निश्चित. वाहतुक नियमांचे पायमल्ली करण्या-या वाहन चालकावर कडक कारवाई करण्यात येईल.