तुझ्या होणाऱ्या चिडचिडीस कोण जबाबदार आहे?
बघ आठवून एकदा!
नाही त्या गोष्टीची तू चिंता करते,
नाही त्या गोष्टीसाठी तू माझ्याशी भांडते,
नाही त्या गोष्टीसाठी तू मला खिजविते,
तुला कदाचित जाण नसेल तुझ्या माझ्या असण्यातच निसर्गाने फरक केलाय,
मग तरीही मी जबाबदार कसा?
तुझ्या मनात येणाऱ्या संशयास कोण जबाबदार आहे?
बघ आठवून एकदा!
कधीकधी गरजेपेक्षा जास्त अपेक्षा करते,
कधीकधी एखाद्यावर जास्त विश्वास टाकतेस,
नाही सहन झालं की माझ्यावर खापर फोडतेस,
स्वभाव वैशिष्ट्ये स्त्री पुरुषाची वेगवेगळी असतात,
मग तरीही मी जबाबदार कसा?
तुझ्या मनात उठणाऱ्या भावनांच्या वादळाला कोण जबाबदार आहे?
कधी रडवेली होतेस,
कधी स्वतःच मन मारून घेतेस,
कधी आक्रमक होतेस,
कोणी नाही मिळालं मन मोकळं करायला तर माझ्यापाशी व्यक्त होतेस,
मेंदूत स्त्रवणाऱ्या त्या रासायनिक घटकामुळे हे होत
मग तरीही मी जबाबदार कसा?
दिली नसतील गुलाबाची फुले कधी,
पण टेकवायला तुझं डोकं दिला असेल आधार जन्मजन्मांतरीचा,
दिल नसेन सोन्याने मढवून कधी,
पण दिली असतील असतील स्वप्ने भविष्याची,
गायल्या नसतील कौतुकाच्या चार ओळी कधी,
पण कुरवाळलं असेन अंतरंगाच्या उमाळ्याने,
दिले नसतील चार क्षण तुझ्या मनीच्या गोष्टी ऐकण्यासाठी,
पण दिली असेन कृतज्ञता डोळ्यांच्या कोपऱ्यातून,
ती तुला समजली नाही तरीही मी जबाबदार कसा?
(पती पत्नीचं नातं भावभावनांनी गुंफलेलं रेश्मी धागा असत,बैलगाडीच्या चाकासारखं असत,एकाला ताण पडला की दुसऱ्याच्या डोळ्यात हळुवार पाणी तरळत.बऱ्याच वेळा चूक कोणाचीच नसते पण जबाबदार मात्र आपण एकमेकांना ठरवत असतो.न राहवून त्याच रूपांतर कलहात होत,मग जवळचा आपला माणूसही दूरचा भासायला लागतो.अशा एका पतीला आपल्या पत्नीबद्दल पडलेलं हे कोड.
बघा कोणाला सोडवता येत का?)
– डॉ.कृष्णा सुभाष सपाटे