मुंबई | गॅसवर आधारित ट्रायजनरेशन ऊर्जानिर्मिती करून वीजबचत व संसाधन संवर्धनासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या विविध विभागांनी केंद्र शासनाच्या एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबरोबर सामंजस्य करार केला. यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बचत होणार असून त्यावरील खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालये, उपहारगृहे, आमदार निवास, मोठ्या संस्था, कार्यालये आणि प्रशासकीय कार्यालये येथे ट्रायजनरेशन प्रकल्प उभारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.