मुंबई | दूध किंवा दूधापासून बनविण्यात येणा-या अन्य पदार्थात भेसळ केल्यास आता खैर नाही. कुठलाही व्यक्ती अथवा संस्था असे करतांना आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करुन संबंधित व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
दरम्यान, यासंदर्भात कायद्याची सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आले आहे. मंत्रिमंडळात याविषयी शिक्कामोर्तब झाले असून कडक कायदा करण्यात आले आहे.