मुंबई | २०१३ पासून आजपर्यंत मुंबई महानगरात २६ हजारांपेक्षा मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या आकडेवारीनुसार जवळपास २२०० मुलींचा यात समावेश आहे. या बेपत्ता मुलींचा अद्यापही पत्ता लागलेले नाही.
दरम्यान, विधानसभेत मंगलप्रसाद लोढा आणि अन्य आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेपत्ता मुलांच्या संदर्भात सभागृहात माहिती दिली.