औरंगाबाद | ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा साक्षात पुरस्कार नाशिकचे प्रा. सुदाम राठोड यांना जाहिर करण्यात आला आहे. राठोड यांच्या ‘आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते’ या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या १ डिसेंबर २०१८ रोजी औरंगाबाद येथील गोविंदभाई श्राॅफ ललित कला अकादमी सभागृह येथे ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
दरम्यान, साक्षात प्रकाशनाच हे तिसरं पुरस्कार असून नव्या पिढीतील मजबूत लेखन करणा-या लेखक, कवी, समीक्षक यांना हा पुरस्कार दिला जातो. यासंदर्भात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल असे साक्षात प्रकाशनाच्या माधुरी राऊत, पुरस्कार समारंभाचे निमंत्रक डाॅ. क्षीरंग देशपांडे, साहित्यिक डाॅ. वीरा राठोड, इंद्रजित भालेराव व नागेश अंकुश यांनी म्हटले आहे.