थंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात चेहरा निस्तेज आणि कोरडा पडतो. आणि म्हणूनच चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. पण मात्र या हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे एक आव्हानच असते. पण आपण हिवाळ्यात आपल्या चेहऱ्याची काळजी अती सहजतेने घेवू शकतो. कुठलेही महागडी उत्पादने न वापरता आणि अगदी कमी खर्चात आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेवू शकतो. हळद आणि मधच्या माध्यमातून आपण आपल्या चेहऱ्याची अतिशय चांगली काळजी घेवू शकतो. हळद आणि मधचा आहारात समावेश करून आपण आपला चेहरा आणखी उजळ करू शकतो.
१) लिंबाचा रस आणि दही मधात मिश्रित करून लावल्याने चेहऱ्यावर तेज येतो.
२) मध आणि खोबऱ्याचं तेल मिश्रण करून लावल्याने चेहऱ्यावरचे दाग कमी होतील.
३) मध आणि हळद, गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा अधिक उजळतो.
४ मध, बेकिंग सोडा एकत्र करून हात आणि पायाला लावल्याने त्वचेवरिल मृत पेशी दुर होतात.