चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. काही लोकांना इतकी सवय असते की चहाविना जगणे अशक्य होईल असे करतात. परंतु लोक चहा पिताना अनेक चुका करतात. जास्त चहा पिल्ल्याने आपल्याला हानीही होवू शकते. आपण चहा पिताना अनेक चुका करतो. मात्र या चुका मुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होवू शकते. तर जाणून घ्या या चुका टाळण्यास तुम्ही चहाचा आनंद घेवु शकता.
१) रिकाम्या पोटी चहा न पिणे कारण रिकाम्या पोटी चहा पिणे नुकसानकारक असते. याने अॅसिडिटी वाढते आणि कर्करोग सारख्ये आजार होवू शकतात. तसेच लवकर वयस्कर दिसू लागतात. यासाठी सकाळी उठल्यावर चहा घेण्याऐवजी पाणी प्यावे.
२) जेवणानंतर चहा घेणे टाळावे. काही लोकांना जेवण झाल्यावर चहा पिण्याची सवय असते. परंतु असे केल्याने आहारात घेतलेले पोषक तत्व शरीरात अवशोषित होत नाही.
३) चहाचे अधिक सेवन करणे टाळावे. चहाचे अधिक सेवन आरोग्यासाठी हानिकारक असते. काही प्रमाणात चहा अल्कोहल प्रमाणे आहे. याने पेशी सक्रिय राहतात. परंतु अधिक सेवन केल्यास हानिकारक आहे.
४) अति उकळलेले चहा घेणे धोक्याचे असू शकतात. चहा अति उकडून किंवा कडक चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे अॅसिडिटीची समस्या उद्भवते.